सिनेतारका नूतनच्या मुंब्रा येथील बंगल्यामध्ये चोरी करण्याप्रकरणी एकाला अटक

जुन्या जमान्यातील सुप्रसिध्द सिनेतारका नूतनच्या मुंब्रा येथील बंगल्यामध्ये चोरी करण्याप्रकरणी एकाला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे. पारसिक हिलवर चित्रपट अभिनेत्री नूतनचा बंगला आहे. या बंगल्यात दोन सुरक्षारक्षक काम करतात. गेल्या आठवड्यात रात्री १ च्या सुमारास तीन व्यक्ती बंगल्यात शिरल्या आणि त्यांनी या सुरक्षा रक्षकांना मारहाण केली आणि बंगल्यातील पाईप तसंच नळ चोरून नेले. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखाही समांतर तपास करत होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार कळव्यातील भास्करनगर येथून संजय भंडारी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीमध्ये भंडारीनं इतर दोघांच्या सहाय्यानं या चोरीची कबुली दिली. आता पोलीस जितू वाघमारे आणि गणपत गुलाल यांचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading