ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेला पार्कींगमधून सर्वाधिक उत्पन्न देणारं स्थानक ठरणार

ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेला पार्कींगमधून सर्वाधिक उत्पन्न देणारं स्थानक ठरणार आहे.ठाणे रेल्वे स्थानकाजवळ तळ अधिक एक मजला अशी पार्कींगची सुविधा उभारण्यात आली असून साडेतीन हजार स्क्वेअर मीटरच्या पार्कींगमध्ये अडीच हजार वाहनं उभी करता येणार आहेत. मध्यंतरी या पार्कींगला ठेकेदार मिळत नसल्यामुळं पार्कींगची जागा तयार होऊनही पार्कींगसाठी वापरली जात नव्हती. मात्र आता मध्य रेल्वेला या पार्कींगसाठी ठेकेदार मिळाला आहे. ठाणे पश्चिमेला असलेल्या पार्कींगसाठी वार्षिक दीड कोटी रूपये दरानं हा ठेका देण्यात आल्याचं सांगितलं जातं. यामुळं तीन वर्षात मध्य रेल्वेला साडेचार कोटीहून अधिक रूपये मिळणार आहेत. ठाणे पूर्वच्या पार्कींगसाठीही १ कोटीहून अधिक रक्कम दरवर्षी मिळणार असून तीन वर्षाच्या ठेक्यासाठी तीन कोटीहून अधिक रक्कम मध्य रेल्वेला मिळणार आहे. यामुळं पार्कींगसाठीची जागा ही मध्य रेल्वेला मोठ्या प्रमाणावर महसुल मिळवून देणारी यंत्रणा ठरली आहे. ठाणे पूर्वला असलेल्या पार्कींगमध्ये १७०० वाहनं उभी करता येणार आहेत. या पार्कींगमुळे रेल्वे स्थानकाजवळील पार्कींगचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटल्यात जमा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading