सिग्नलवरील मुलांना रंग, पिचकाऱ्या आणि पुरणपोळीचं वाटप करून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली अनोख्या पद्धतीने होळी साजरी

सिग्नलवरील मुलांना रंग, पिचका-या आणि पुरणपोळीचं वाटप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं अनोख्या पध्दतीनं होळीचा सण साजरा केला. होळी सण सर्वत्र साजरा होत असताना तीन हात नाका येथील सिग्नलवर राहणा-या मुलांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न विद्यार्थी सेनेनं केला. जी मुले रस्त्यावर राहतात, ज्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यांनाही आपल्या सणाचा आनंद लुटता यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी मुलांना पिचकारी, रंग, पुरणपोळी वाटप करून मुलांबरोबर धुळवड साजरी केली. होळीच्या दिवशी अनोख्या भेटवस्तू आणि पुरणपोळी मिळाल्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading