सिगारेटचे गोदाम फोडणा-या दुकलीस अटक

सिगारेटचे गोदाम फोडणा-या दुकलीस पोलीसांनी अटक केली आहे. नौपाड्यातील चरई भागात आरजेएन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही सिगारेट एजन्सी आहे. २ सप्टेंबरच्या रात्री या एजन्सीचं कार्यालय फोडून चोरट्यांनी ८ लाख ४३ हजारांचे सिगारेट बॉक्स, १८ लाख ९७ हजारांची रोकड, २ मोबाईल फोन असा २७ लाख ४२ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी नौपाडा पोलीस तपास करत होते. या घटनेत चोरी केलेल्या दोघा चोरट्यांचे मोबाईल लोकेशन डोंबिवलीत दिसत होते. त्यानुसार पोलीसांनी महम्मद अब्बासी याला डोंबिवलीतून अटक केली. त्याच्या चौकशीत त्यानं ही चोरी आपला मित्र रामबाबू सरोजच्या मदतीनं केल्याची कबुली दिली. पण रामबाबू हा त्याच्या मूळगावी उत्तरप्रदेशमध्ये गेला होता. त्याला इलाहाबाद इथून अटक करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading