सिंहगड एक्सप्रेसमध्ये धक्कादायक प्रकार – महिलेची छेड काढणा-यास अटक

सिंहगड एक्स्प्रेस मध्ये आज धक्कादायक प्रकार घडला असून एका महिलेची छेडछाड काढणा-यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस मध्ये आज पहाटे एका महिलेचा व्हिडिओ काढत छेडछाड करण्याचा प्रकार घडला. यावेळी महिलेने गोंधळ घातल्यानंतर प्रवाशांनी व्हिडिओ काढणाऱ्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मोहम्मद अश्रफ असे छेडछाड करणाऱ्या आरोपीचे नाव असून याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीसांनी अश्रफ याच्यावर गुन्हा दाखल केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading