सिंगापूर येथे होणा-या एशियन चॅम्पियनशिपसाठी ठाण्यातील तीन मुलांची निवड 

एशियन चॅम्पियनशिपकरीता ओरिसा भुवनेश्वर येथे झालेल्या चाचणी स्पर्धेत ठाण्यातील दोन मुली आणि एक मुलाची निवड करण्यात आली. निवड झालेल्या तिन्ही जिमनॅस्टिक मुलांचे ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभिनंदन केले. त्यांना सरावासाठी आवश्यक सर्व साधनसामुग्री उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे आता यापुढे अंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता ठाण्यातून खेळाडूंची निर्मिती होणार आहे. जिमनॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून आगामी एशियन चॅम्पियनशिप करीता निवड झालेल्या मुलांमध्ये प्रथम आलेला आर्यन दवंडे आणि दुसऱ्या क्रमांकावर सारा राऊळ आणि तिसऱ्या क्रमांकावर त्रिशा शहा यांची निवड झाली. जिमनॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ठाण्यातून पाच मुले हि निवड स्पर्धेत उतरली होती. तर भारतातून तब्बल विविध संस्थेतून ३५ मुले निवड स्पर्धेत होती. यात मुलांमध्ये आर्यन दवंडे हा प्रथम आला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाने सारा राऊळ आणि त्रिशा शहा यांची निवड झाली. हे तिन्ही खेळाडू आता १० ते १२ जून मध्ये सिंगापूर येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप करिता भारताचे प्रतिनिधित्व जिमनॅस्टिक स्पर्धेत करणार आहेत. जिमनॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया चे कोच म्हणून महेंद्र बाभुळकर, सहकारी प्रणाली मांडवकर आणि अद्वैत वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यन दवंडे, सारा राऊळ  आणि त्रिशा शहा यांनी मार्गक्रमण करीत आपल्या नावाची नोंद आणि निवड आगामी १० ते १२ जूनमध्ये सिंगापूरमध्ये होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपसाठी नोंदविले.  जिमनॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे मुले-मुली या पूर्वी सरस्वती संकुलात सर्व करीत होते. आता पोखरण रोड येथील पालिकेच्या हॉलमध्ये करीत होते. आता तिन्ही मुले एशियन चॅम्पियनशिपमध्ये ठाणेकरांचा ठसा उमटविणार आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading