सायंकाळी सातनंतर सुरु राहणारी ७२ आस्थापना सील

सायंकाळी सातनंतर सुरू राहणाऱ्या सर्व आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर काल ७२ आस्थापनांवर धडक कारवाई करून ह्या आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. दरम्यान यापुढेही कारवाई सुरु ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. सायंकाळी सातपर्यंत सर्व आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश असतानाही काही आस्थापना सातनंतरही सुरू राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त रोज सायंकाळी सात ते साडे सात या कालावधीत आपल्या प्रभागामध्ये फिरून सुरू असणाऱ्या आस्थापना तसेच अन्न पदार्थाच्या स्टॅाल्सवर कारवाई करत असून काल जवळपास ७२ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading