सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021 संकलन शुभारंभ कार्यक्रमात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते  जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेने निधी संकलनाचा लक्षांक साध्य केला. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह सहाय्यक प्रशासन अधिकारी शुभांगी रावत, वरिष्ठ सह्यायक समीर राऊत यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून निधी संकलनाचे जिल्हा परिषदेला दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्यात यश आले. २०१९ मध्ये १२ लाख आणि २०२० मध्ये १० लाखाचा निधी जिल्हा परिषदेने जिल्हा सैनिक कल्याण विभागाला सुपूर्द केला. हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी जिल्हा परिषदेचे आणि सर्व पंचायत समितीच्या विभागांनी सहकार्य केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading