जिल्ह्यात आज ५० हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार सायंकाळी सातपर्यंत ४९ हजार ८५६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९ लाख ८९ हजार ३०१ डोसेस देण्यात आले असून उद्यापर्यंत संपूर्ण जिल्हा १ कोटी डोसेसचा टप्पा गाठू शकतो.

जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६० लाख ४५ हजार ७०६ नागरिकांना तर ३९ लाख ४३ हजार ५९५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४५० सत्र आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading