सरोवर दर्शन गृहनिर्माण संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती

सरोवर दर्शन गृहनिर्माण संस्थेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. सुमारे १८ वर्षापूर्वी सरोवर दर्शन गृहनिर्माण संस्था बांधण्यात आली. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाअंतर्गत सुमारे ९ इमारती उभारण्यात आल्या. या ८ मजल्यांच्या ९ इमारतींमध्ये ५१८ कुटुंबं राहतात. या गृहनिर्माण संस्थेवर यापूर्वीही प्रशासक नेमण्यात आला होता. संस्थेच्या मनमानी आणि बेशिस्त कारभारावर ही कारवाई करण्यात आली आहे. या गृहनिर्माण संस्थेच्या कारभाराबाबत ब-याच तक्रारी होत्या. या तक्रारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थांकडे पाठवण्यात आल्यानंतर सहाय्यक निबंधकांनी या संस्थेची चौकशी लावली होती. सहाय्यक निबंधकांनी घेतलेल्या आक्षेपांवरही संस्थेच्या पदाधिका-यांनी योग्य खुलासा न केल्यामुळं सहाय्यक निबंधकांनी सुनील शिंदे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. संस्थेच्या सर्व पदाधिका-यांना अपात्र ठरवून नव्यानं निवडणुक घेण्याचे आदेश प्रशासकांना देण्यात आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading