सरस्वती शाळेची विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण शृंखला

पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात बंधमुक्त कृतिशील सहजशिक्षण देण्याचा उपक्रम राबवणाऱ्या ठाण्यातील सरस्वती शाळेच्या मुख्यध्यापिका रती भोसेकर यांनी विद्यार्थ्यासाठी नवी दृष्टी नवी ओळख ही ऑनलाईन प्रशिक्षण शृंखला आयोजीत केली आहे. हे प्रशिक्षण सशुल्क असून दोन सत्रांमध्ये होणार आहे. येत्या 21, 23 आणि 25 सप्टेंबर रोजी खेळावर आधारीत तर 5, 7 आणि 9 ऑक्टोबर रोजी चित्रकलेविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. लहानग्यांसोबत पालकांनाही यात सहभागी होता येणार आहे. इच्छुकांनी नाव नोंदणी तसेच,विस्तृत माहितीसाठी 9867937386 अथवा 9850589088 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रती भोसेकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading