बुश येथील कोविड रूग्णालयात रूग्ण दाखल करण्यास सुरूवात

वागळे प्रभाग समितीतंर्गत बुश कंपनीच्या आवारात ठाणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले कोविड रूग्णालय कार्यान्वित करण्यात आले असून तेथे आता रूग्ण दाखल करण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच कोरोना विरूद्धच्या लढाईला बळ देणा-या बुश कंपनी येथे उभारलेल्या कोविड रूग्णालयाचा अनौपचारिक लोकार्पण सोहळा पार पडला होता. या रूग्णालयामध्ये आता रूग्णांना दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. या ठिकाणी सर्व सुविधा तसेच वैद्यकिय आणि वैद्यकेत्तर कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या रूग्णालयामध्ये एकूण ४४० बेडस् असून यातील ३५० बेडस् हे ॲाक्सीजन बेडस् आहेत तर साधे बेडसची क्षमता ९० इतकी आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading