जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे येत्या सोमवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग घेणार आहेत. ठाण्यातील सुप्रसिध्द मराठी शाळा सरस्वती विद्यामंदिरचा शुभारंभ जिल्हाधिका-यांच्या हस्ते होणार असून त्यावेळी जिल्हाधिकारी हा वर्ग घेणार आहेत. येत्या सोमवारी ही शाळा भव्य अशा सात मजली इमारतीत सुरू होणार आहे. हा दिवस संस्मरणीय व्हावा म्हणून नूतन वास्तूचा शुभारंभ जिल्हाधिका-यांच्या हस्ते तर शाळा सुरू होण्याची पहिली घंटा, महापौर आणि शाळेचे माजी विद्यार्थी नरेश म्हस्के देणार आहेत.