सरकारनं कितीही बंंधनं घातली तरी शिवजयंती साजरी होणारच – सकल मराठा समाज

सरकारनं कितीही बंधनं घातली तरी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल असं प्रतिपादन सकल मराठा समाज समन्वयक रमेश आम्ब्रे यांनी केलं आहे. सकल मराठा समाजातर्फे साज-या करण्यात येण-या शिवजयंती उत्सवाबाबत माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत आम्ब्रे यांनी हे प्रतिपादन केलं. शिवजयंतीनिमित्त १८, १९,२० फेब्रुवारीला शिवछत्रपती आणि त्यांचे गड किल्ले यांवर आधारीत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.तसेच ५० हजार मातीच्या दिव्यांपासून ३० बाय ४० फूटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मोझेक प्रोट्रेट साकारून त्यांची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं. १८ तारखेला मराठा समाजाचे २५ कार्यकर्ते शिवनेरी वरून ज्योत घेऊन ठाण्यात येणार आहेत असे रमेश आंब्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading