श्रमिक जनता संघ राष्ट्रीय युनियनच्या अध्यक्ष पदावर मेधा पाटकर यांची पुन्हा निवड – तर सरचिटणीसपदी जगदिश खैरालिया यांची नियुक्ती

श्रमिक जनता संघ या राष्ट्रीय युनियनच्या अध्यक्ष पदावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे तर ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदिश खैरालिया यांची युनियनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. उपाध्यक्ष पदावर संजय मं. गो., नितीन शिवकर, सचिव पदावर सुनिल कंद, संजय चव्हाण, खजिनदार म्हणून अविनाश नाईक यांची निवड करण्यात आली आहे. श्रमिक जनता संघाच्या अध्यक्षा मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सेंच्युरी यार्न आणि डेनिम कंपनीच्या कामगारांचा गेले १२०८ दिवस काम द्यावं या मागणीसाठी सत्याग्रह सुरू आहे. ४४ कामगार कायद्यांऐवजी चारकोड या कामगार विरोधी सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ देशभरातील कामगार संघटनांसह आंदोलन उभारणीसाठी निर्धार व्यक्त करत कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता विविध १० ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading