समूह विकास योजनेच्या संदर्भात पसरवल्या जात असलेल्या अफवांचं शंका निरसन करण्यासाठी बैठकीचं आयोजन

समूह विकास योजनेच्या संदर्भात पसरवल्या जात असलेल्या अफवांचं शंका निरसन करण्यासाठी विटावा कोळीवाडा येथे एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये समूह विकास योजनेसंदर्भात घेण्यात आलेल्या हरकती, त्यावर शासनाची भूमिका, नियोजन भवनात झालेली बैठक, गावठाण कोळीवाडे वगळण्याबाबत राज्यपालांच्या बैठकीत झालेली चर्चा तसंच केंद्र शासनाच्या मत्स्य संपदा योजनेची माहिती या बैठकीत देण्यात आली. तसंच उपस्थितांच्या शंकांचं निरसनही करण्यात आलं. या बैठकीत जनजागृती करण्यासाठी मोठ्या सभेचं आयोजन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. गावक-यांना सत्य परिस्थिती समजावी हा या बैठकीमागचा उद्देश होता. विटावा कोळी ग्रामस्थ मंडळ, चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समिती तसंच ठाणे शहर गावठाण पाडे संवर्धन समितीतर्फे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading