मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला काल झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू – तर कथोरेही किरकोळ जखमी

मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला काल झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर कथोरेही किरकोळ जखमी झाले आहेत. किसन कथोरे हे मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रम आटपून काल पावणेसातच्या सुमारास अनखरपाडा, गोवेली, वोहोली मार्गे बदलापूरकडे येत असताना हा अपघात झाला. समोरून येणा-या दुचाकीनं त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीवर बसलेला तरूण मृत झाला तर मागे बसलेल्या युवतीचा रूग्णालयात मृत्यू झाला. किसन कथोरे यांच्या मानेला दुखापत झाली असून त्यांचा अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यक सुखरूप आहेत. तर वाहन चालकही किरकोळ जखमी झाला असून त्यांच्या गाडीचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading