जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे जलदगतीने निवारण करणे आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा, समस्यांचा सखोल अभ्यास करणे या उद्देशाने आज तृतीयपंथीय व्यक्तींना त्यांच्या अधिकारासंदर्भात कायदेविषयक मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले. सतिश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजमध्ये तृतीय पंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र आणि ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.विद्यार्थीदशेत मुलांवर तृतीयपंथीय व्यक्तींना समानतेची वागणूक देण्याचे संस्कार झाले पाहिजेत यासाठी महाविद्यालय बिइंग एम ई हा कार्यक्रम राबवत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. लांगी यांनी यावेळी दिली.