समाजमाध्यमांच कितीही आक्रमण झालं तरी मराठी भाषेला मरण नाही – नारायण बारसे

समाजमाध्यमांच कितीही आक्रमण झालं तरी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात शैक्षणिक आणि अवांतर वाचनासाठी मराठी पुस्तकांसाठी येणारी विद्यार्थ्यांची संख्या पाहिल्यावर मराठी भाषेला मरण नाही असा ठाम विश्वास जोशी- बेडेकर महाविद्यालयाचे ग्रंथालय आणि महितीशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक नारायण बारसे यांनी व्यक्त केला. स्वराज सामाजिक संस्था, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कृष्णा प्रकाशन तर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित मराठी पुस्तकांच्या प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभात प्राध्यापक नारायण बारसे बोलत होते. ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकात असणाऱ्या खुल्या कलादालनात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मातृभाषेत बोलणाऱ्या जनसमुदायात मराठीचा सातवा क्रमांक लागतो. जगातील ६५ देशांमध्ये मराठीत संवाद साधला जातो. त्यामुळे मराठी भाषेचा ऱ्हास होणार नसला तरी त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्यावर आहे. इतर भाषेतील मराठीत भाषांतर झालेलं साहित्य विद्यार्थी, युवकांना वाचण्याठी प्रवृत्त करण्याची आवश्यकता असल्याचे मत बारसे यांनी यावेळी व्यक्त केले. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध विषयांवरील मराठीतील सुमारे तीनशेहून जास्त पुस्तके मांडण्यात आली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading