समन्वय प्रतिष्ठानतर्फे एनईईटी आणि जेईई परीक्षेसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत प्रशिक्षण

समन्वय प्रतिष्ठानतर्फे एनईईटी आणि जेईई परीक्षेसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. समन्वय प्रतिष्ठाननं मोफत प्रशिक्षण देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. एनईईटी आणि जेईई परीक्षेच्या शिकवणी वर्गाकरिता लाखो रूपये आकारले जातात. मात्र गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ५ नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी २५३० ४००५ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचं आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केलं आहे. एनईईटी आणि जेईई परीक्षेच्या शिकवणी वर्गाचं शुल्क गरीब विद्यार्थ्यांना परवडत नाही त्यामुळं क्षमता असूनही अनेकदा गुणवंत मुलं या परीक्षांपासून दूर राहतात. म्हणून समन्वय प्रतिष्ठानच्या वतीनं गुणवंत मुलांना वर्षभर मोफत निवासी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी काही अटी-शर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. प्रवेश परीक्षेतून पात्र ठरणा-या विद्यार्थ्यांची वर्षभराच्या निवासी प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार असून पालकांना काहीही खर्च येणार नाही असं निरंजन डावखरे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading