ठाणे जिल्हा न्यायालयात मुख्य सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ संजय लोंढे यांची नियुक्ती

ठाणे जिल्हा न्यायालयात मुख्य सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ संजय लोंढे यांची नियुक्ती झाली आहे. सध्याच्या मुख्य सरकारी वकील संगिता फड यांच्या जागेवर अचानक संजय लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संगिता फड यांच्या कार्यपध्दतीबाबत असलेल्या तक्रारीनंतर ही नियुक्ती झाल्याचं सांगितलं जातं. संजय लोंढे हे गेली २२ वर्ष सरकारी वकील म्हणून काम करत असून मुख्य सरकारी वकील पदी नियुक्ती होण्यापूर्वी ते अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम करत होते. ठाणे जिल्हा वकील संघटनेतर्फे संजय लोंढे यांचा मुख्य सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल खास सत्कार करण्यात आला. जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले यांनी पूर्वीच्या सरकारी वकीलांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करावं आणि कोणाकडूनही तक्रार येऊ देऊ नका असा सल्ला यावेळी दिला. तर ज्येष्ठ विधीज्ञ ए. डी. चव्हाण यांनी सी. जी. ठाणावाला, एस. सी. भाटिया, व्ही. डी. साळी, व्ही. पी पाटील अशांनी यापूर्वी मुख्य सरकारी वकील म्हणून काम केलं असून त्यांच्या परंपरेनुसार काम करावं असं सांगितलं. तर सत्काराला उत्तर देताना आपण सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करू असं काम करू असं मुख्य सरकारी वकील संजय लोंढे यांनी सांगितलं. संगिता फड यांच्या जागेवर संजय लोंढे यांची अचानक झालेली नियुक्ती न्यायालयात चर्चेचा विषय ठरली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading