शहरात 1 हजार 33 चेंबर्सची झाकणे लावून पूर्ण

पावसाळयात कोणत्याही प्रकारे दुर्घटना घडू नये यासाठी ज्या ठिकाणी चेंबर्सवर झाकणे नाहीत तेथे तात्काळ झाकणे बसविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरातील सर्व चेंबर्सवर 1033 झाकणे बसविण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी ठाणे महापालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असून शहरात खुल्या चेंबर्समुळे दुर्घटना घडू नये यासाठी सर्व चेंबर्सवर झाकणे बसवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर शहरातील चेंबर्सवर 1033 झाकणे बसविण्यात आली आहेत. यामध्ये नौपाडा प्रभाग समितीतंर्गत 203, माजीवडा मानपाडा प्रभाग समिती 202 , उथळसर प्रभाग समिती 111, कळवा प्रभाग समिती 91, दिवा प्रभाग समिती 202, वागळे प्रभाग समिती 51, वर्तकनगर प्रभाग समिती 171 तसेच लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये 2 झाकणे बसविण्यात आली आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading