ठाण्यातील काही भागाचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तर तर काही भागाचा पाणी पुरवठा १२ तास बंद राहणार

ठाण्यातील काही भागाचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तर तर काही भागाचा पाणी पुरवठा १२ तास बंद राहणार आहे.

या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला वेळोवेळी पूर आला असून पुराच्या पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा जमा झाला आहे. हा गाळ आणि कचरा पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने पंपाद्वारे होणारा पाण्याचा फ्लो कमी झाला आहे. हा गाळ काढण्यासाठी बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत शटडाऊन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत १२ तासांसाठी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहिल. तसेच इंदिरानगर संप कडे जाणाऱ्या १९६८ मुख्य गुरुत्वजलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनसाठी इंदिरानगर संप वरील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, येऊर, डिफेन्स, विठ्ठल क्रिडा मंडळ, किसननगर या भागात पाणी पुरवठा बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पुर्णपणे बंद राहिल. या शटडाऊन मुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading