सफाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यास मंजुरी

सफाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. सफाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज १०० हून अधिक रुग्ण येतात. या भागातील वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करावे. त्याचबरोबर तेथे एक्स-रे, ईसीजी, गरोदर माता किंवा अतिजोखमीच्या मातांवर शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी विधान परिषदेत २०२१ मधील अधिवेशनात आमदार निरंजन डावखरे यांनी विशेष उल्लेखाद्वारे केली होती. त्यासंदर्भात तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वतंत्रपणे पत्र पाठवून सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धनासंदर्भात लवकरच मंजूर करण्यात येईल. तसेच त्याचा आरोग्य विभागाच्या जोड बृहत आराखड्यामध्ये समावेश केला जाईल, असे आश्वासन दिले होते. या प्रश्नासंदर्भात आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात होता. अखेर राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading