टोमॅटोच्या भावात येत्या काही दिवसात घसरण अपेक्षित

टोमॅटोच्या भावात येत्या काही दिवसात घसरण अपेक्षित आहे. गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोचे दर हे गगनाला भिडले होते. त्यामुळे ग्राहकांना टोमॅटो खरेदी करणे परवडत नव्हते. 150 ते 200 रुपये किलोवर पोहचलेले टोमॅटो सध्या 100 ते 120 रुपये किलो ने विकले जात आहेत. सध्या एपीएमसी मार्केट मध्ये नाशिक वरून येणाऱ्या टोमॅटोला ग्राहक पसंती देत आहेत. येणाऱ्या 15 दिवसांनंतर ते एक महिन्याने टोमॅटोच्या दरामध्ये घसरण होईल असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading