संस्कृती कला क्रीडा महोत्सवाचा अंतिम सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न

संस्कृती कला क्रीडा महोत्सवाचा अंतिम सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला.
लोकमान्यनगर-शास्त्रीनगर विभाग आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या कला-गुणांना वाव मिळावा तसंच आपली कला जोपासावी या उद्देशाने नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांच्यातर्फे संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्कृती कला-क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात बुध्दिबळ, कॅरम, क्रिकेट, स्विमिंग, चित्रकला, रांगोळी, पाककला, गायन, नृत्य, फॅन्सी ड्रेस, मिस अँड मिसेस लोकमान्यनगर, होम-मिनिस्टर अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धामध्ये लहान मुलांपासून, महिला, पुरूष ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. मिस लोकमान्यनगर हा किताब सायली देसाई, उपविजेती प्रिया राऊत आणि उपांत्य विजेती सिध्दी शिंदे हिने पटकावला तर मिसेस लोकमान्यनगर हा किताब निता सावंत, उपविजेत्या रजनी अहिरे आणि उपांत्य विजेत्या मिना अग्रवाल यांनी पटकावला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading