मल उदंचन केंद्रातील कर्मचा-यांना बोनस देण्याचे सहाय्यक कामगार आयुक्तांचे आदेश

मल उदंचन केंद्रातील कर्मचाऱ्यांना बोनस अदा करण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्तांनी महापालिकेला दिले आहेत. ए. के. इलेक्ट्रीकल एण्ड वर्क्स या ठेकेदारांनी मल उदंचन केंद्रातील कर्मचाऱ्यांना अद्यापही २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचे बोनस अदा केलेले नाहीत. श्रमिक जनता संघाने थकित बोनस साठी ठाणे कामगार उप आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. वारंवार होणाऱ्या सुनावणीत ठाणे महापालिका अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित रहात नसल्याने बोनस प्रदान अधिनियम १९६५ अंतर्गत कारवाई करण्याची नोटीस ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाला सहाय्यक कामगार आयुक्त चेतन जगताप यांनी दिली आहे.
कामगारांना कायदेशीर वेतन, भत्ते आणि सोयीसुविधाही ठेकेदार ए. के. इलेक्ट्रीकल एण्ड वर्क्स अदा करत नसल्याने ठाणे औद्योगिक न्यायालयात ही केस सुरू असल्याचे युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगितलं तसंच यांत्रिकी विभागाचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. मल उदंचन केंद्र आणि मलनिस्सारण विभागाच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुक्तांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि संबंधित अधिका-यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ही खैरालिया यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading