संशयित रूग्णांनी तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत स्वतःला क्वारंटाईन करुन घेण्याचे आवाहन पालिका आयुक्तांचे आवाहन

शहरातील कोव्हीडची प्राथमिक लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांनी आपली तपासणी आयसीएमआर प्राधिकृत प्रयोगशाळेमध्येच करून तपासणी अहवाल प्राप्त होई पर्यंत स्वतःला क्वारंटाईन करुन घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.
शासनाच्या कोव्हीड तपासणीबाबतच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार महापालिका क्षेत्रातील बरेचसे नागरिक सर्दी , खोकला , ताप घशामध्ये सूज येणे आणि अशक्तपणा येणे यापैकी कोव्हीड 19 ची कोणतीही किमान तीन लक्षणे आढळून आल्यास स्वतःहून खाजगी प्रयोगशाळेकडे स्वॅब तपासणीसाठी पाठवून परस्पर तपासण्या करुन घेत आहेत. मात्र असे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविल्यानंतर तपासणीचे अहवाल प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीत ते स्वतःला क्वारंटाईन करुन घेत नाहीत. त्यामुळे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीत या व्यक्ती इतर व्यक्तींच्या संपर्कात येतात. यामुळे संशयित रुग्णांपैकी एखादा रुग्ण पॉझीटीव्ह आल्यास त्या रुग्णांपासून इतरांना कोरोनाची लागण होवू शकते. हा संसंर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी ही खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading