ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयांना खासदार श्रीकांत शिंदेंच्या वतीने 20 व्हेंटिलेटर प्रदान

कृष्णा डायगोनोस्टिकस आणि खासदार श्रीकांत फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयांना 20 व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खासदार श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही महापालिका क्षेत्रातील महापालिका रुग्णालयांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. अमेरिकेच्या पलमोनेटिकस कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञानाने केलेल्या या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेता येऊ शकणार आहे. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या अतिगंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी आता मुंबईत हलविता येणे शकय होणार आहे. काल ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांकडे प्रत्येकी 10 व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. दोन्ही आयुक्तांच्या समवेत शिंदे यांनी महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांच्या समस्या आणि उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली आणि आवश्यक सूचना केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading