ठाण्यातील आसरा फाउंडेशन द्वारे तसेच नवी मुंबई मधील आरंभ फार्मा आणि पुण्यातील आशिर्वाद हेल्थ केअर सेंटरद्वारे साताऱ्यातील लोणंद या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा देण्यात आली. यामध्ये ऍक्युप्रेशर,ओरिक्युल, बोन सेटिंग या वैद्यकिय सेवांचा समावेश होता. यावेळी वारकऱ्यांसाठी मोफत उपचार, औषध आणि फळांचं वाटप करण्यात आलं. या वैद्यकीय सेवेचा लाभ शेकडोहून अधिक वारकऱ्यांनी यावेळी घेतला. तसेच या पुढेही असे विविध सामाजिक उपक्रम या संस्थांमार्फत राबविण्यात येतील असे आसरा फाउंडेशनचे सदस्य प्रदीप पाटील यांनी सांगितले.