उत्तरप्रदेश येथून घोडबंदर रोड मार्गे वाशी येथील एपीएमसी मार्केट कडे निघालेला ट्रक वाघबीळ उड्डाणपुलावर चढताना उलटल्याची घटना सकाळी घडली. यावेळी ट्रकमधील १२ टन केशरी आंबे रस्त्यावर आले होते. यामुळे त्या वाघबीळ उड्डाणपूल पासून विजय गार्डन पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रक रस्त्याच्या एका बाजूला केल्यावर तो रस्ता वाहतुकीसाठी तासाभराने मोकळा झाला. याच दरम्यान वाहतूक धीम्यागतीने सुरू होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती कासारवडवली वाहतूक पोलिसांनी दिली.