खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाच्या तीव्र प्रतीक्रीया उमटल्या असुन विविध ठीकाणी संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावरुन शिवसैनिक नाराज झाले आहेत. माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतीमा मलीन केली म्हणुन कापुरबावडी पोलिस ठाण्यात त्यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संजय राऊत यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या महिला आघाडिनं श्रीकांत शिंदे यांच्या वरीलं वक्तव्या विरोधात संजय राऊत यांची प्रतिमा असलेल्या व्यक्तीला ठाण्यातील मनोरुग्णालयात प्रतीकात्मक दाखल करुन निषेध व्यक्त केला.