घोडबंदर आणि सेवा रस्ता एकत्र करण्यास धर्मराज्य पक्षाचा आक्षेप

घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता एकत्रित करण्यास धर्मराज्य पक्षानं आक्षेप घेतला आहे. सेवा रस्ते आणि महामार्ग यांची उद्दिष्ट वेगवेगळी आहेत. महामार्गाला समांतर सेवा मार्ग हा मालमत्ता आणि नागरीसुरक्षा बजावण्यात महत्त्वपूर्ण काम करतो. महामार्गावर वाहतुकीचे काही प्रश्न निर्माण झाल्यास, वाहतूक सुरळीत रहाण्यास सेवा मार्गाचा महत्वपूर्ण उपयोग होतो. त्यामुळे असे रस्ते एकत्रित करणे म्हणजे, कायद्याचे उल्लंघन ठरेल याची गंभीर नोंद घ्यावी. रस्ते हे वाहने चालविण्यासाठी असतात, वाहने पार्किंगसाठी नसतात. जर सेवा रस्त्यावर वाहने पार्किंग होत असतील; तर, पालिकेने समज देऊन कार्यवाही करणे उचित ठरेल. सार्वजनिक सुविधांचा भाग म्हणून वाहतुकीसाठी रस्त्यांची सेवा देण्यात येते. महामार्गाला समांतर सेवा मार्ग विशेष महत्त्वाचा असतो. ही सेवा देणे पालिकेला कायदेशीर बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत मानवी आणि स्थावर मालमत्ता यांच्या सुरक्षिततेला प्राधान्यक्रम देणे कायदेशीर आणि फायदेशीर ठरेल. सेवा रस्ता आणि घोडबंदर रोड एकत्रित करणे हे, धोकादायक आणि महामार्ग निकषांचे उल्लंघन करणारे असल्यामुळेच हे एकत्रित करण्याचे प्रयोजन तत्काळ थांबवावे, अशी विनंती धर्मराज्य पक्षाने केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading