रुग्णांना परवडणाऱ्या जेनेरिक आधार औषध वितरणाच्या ७ व्या टप्प्याचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

रुग्णांना परवडणाऱ्या जेनेरिक आधार औषध वितरणाच्या ७ व्या टप्प्याचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जेनेरिक आधार संस्थेकडून स्वस्त आणि अल्प दरातील औषध वितरणाचा हा सातवा टप्पा आहे. सहाव्या टप्प्याच्या यशानंतर या सातव्या टप्प्यात संस्थेकडून रुग्णांना परवडतील अशा १०१ औषधांची विक्री केली जात आहे. ही औषधे मूळ किंमतीपेक्षा ८० टक्के स्वस्त दरात विकली जात आहेत. अशा उपक्रमाला पाठिंबा देण्याचा आपल्याला अभिमान वाटत आहे. या त्यांच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने सातव्या टप्प्याच्या त्यांच्या या प्रवासात सामील होण्याचा आनंद असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगीतलं. जेनेरिक आधार च्या देशभरातील २००० हून अधिक शाखा आहेत. देशभरात ५ हजार शाखा सुरू करण्याचं उद्दीष्ट असल्याचे अर्जुन देशपांडे यांनी सांगीतलं. जेनेरिक आधार संस्थेच्या शाखांमधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष १० हजाराहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading