श्रीनगर ते गायमुख दरम्यान फूट हिल रोडची आखणी – ४८१ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित

येऊरच्या पायथ्याशी ४८१ कोटी रूपये खर्च करून श्रीनगर ते गायमुख दरम्यान फूट हिल रोडची आखणी एमएमआरडीएने केली आहे. महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात येऊरच्या डोंगर रांगाच्या पायथ्यालगत आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीलगत रस्त्याचे आरक्षण असून ४८१ कोटी रुपये खर्च करून या रस्त्याच्या उभारणीची तयारी ‘एमएमआरडीए’ने केली आहे. ४० मीटर रुंद रस्त्याच्या १२ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी ४८१ कोटींचा अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे. मुलुंड येथून मुंबई शहरात प्रवेश करणाऱ्या आणि गायमुख येथून बोरीवली, पश्चिम उपनगर, पालघर आणि गुजरात दिशेला जाणाऱ्या वाहनांना यामुळे नवा पर्याय उपलब्ध करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. तसेच प्रस्तावित ठाणे किनारा मार्गाला हा रस्ता जोडल्यानंतर ठाणे शहरात रिंग रोड होणार आहे. येऊर पायथ्यापासून जाणाऱ्या या रस्त्याला महापालिकेकडून श्रीनगर ते गायमुख फूट हिल रोड म्हणून नामकरण करण्यात आले होते. मुलुंड येथून सुरू होणारा हा रस्ता गायमुख येथे घोडबंदर रोड आणि भविष्यात प्रस्तावित असलेल्या कोस्टल रोडला जोडल्यामुळे ठाणे शहराच्या रिंग रोडची व्यवस्था पूर्ण होऊ शकणार आहे. मुलूंड, श्रीनगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, उपवन, मानपाडामार्गे डोंगरीपाडा येथे घोडबंदर रस्त्यापर्यंत तेथून घोडबंदर रोडवरून पुढे आनंदनगर येथून पुन्हा डोंगर पायथ्या लगत जाऊन ओवळामार्गे गायमुखपर्यंत या रस्त्याचा विस्तार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading