चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोल प्रेमींची ठिकठिकाणी गर्दी

वर्षाच्या अखेरीस आलेलं चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोल प्रेमींनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. ऐन दिवाळीत सूर्यग्रहण झालेलं असतानाच आठवडाभरात चंद्रग्रहणाचा आनंद लुटण्यासाठी खगोल प्रेमींनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. मात्र मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात साधारणत: १८ मिनिटंच ग्रहण पाहता आलं. यासाठी अनेकांनी आपल्या इमारतीच्या गच्चीवर गर्दी केली होती. पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी ते राहत असलेल्या रहेजा कॉम्प्लेक्सच्या — इमारतीवर खास व्यवस्था केली होती. यावेळी ग्रहणाविषयी असलेले समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी सोमण यांनी मार्गदर्शन केलं. भारतामध्ये काही ठिकाणी हे ग्रहण खग्रास स्थितीत अनुभवता आलं. मात्र आपल्याकडे हे चंद्रग्रहण खंडग्रास स्थितीत अनुभवता आलं. आता पुढच्या वर्षी २ चंद्रग्रहणं आणि २ सूर्यग्रहणं आहेत. यापैकी २ चंद्रग्रहणं ही भारतातून दिसणार आहेत. ५ मे चं छायाकल्प चंद्रग्रहण आणि २८ ऑक्टोबरचं खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून पाहता येणार असल्याचंही खगोल अभ्यासक दा कृ सोमण यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading