श्रीगणेश प्रतिष्ठापना साहित्य अवघ्या २१ रूपयात वाटण्याचा शिवसेनेचा अनोखा उपक्रम

शिवसेनेच्या वतीनं श्रीगणेश प्रतिष्ठापना साहित्य अवघ्या २१ रूपयात वाटण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. गणेशोत्सव म्हटलं की श्रीगणेशाच्या पूजेसाठी आवश्यक साहित्य घेण्यासाठी धडपड सुरू असते. पण सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळं आणि बाजारात गर्दी होऊ नये म्हणून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नगरसेवक विकास रेपाळे आणि वृक्षप्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले यांच्या वतीनं २१ रूपयात श्रीगणेश प्रतिष्ठापना साहित्य ११०० गणेश भक्तांना उपलब्ध करून देण्यात आलं. यामध्ये आरतीसंग्रह, कंठी, कुंकू, गुलाल, अबीर, अष्टगंध, अत्तर, गोमूत्र, धूप, अगरबत्ती, कापूर, वाती, कापसाचं वस्त्र, जानवे जोड, लाल वस्त्र, गूळ-खोबरं, सात सुपारी, खारीक, बदाम, अक्रोड, हळकुंड प्रत्येकी ५, रांगोळी असं ३०० रूपयाचं साहित्य देण्यात आलं. प्रभाग क्रमांक २१ मधील कशिश पार्क, रघुनाथ नगर, सुर्वेवाडी, झरींडेवाडी, हजुरी, गौतमनगर, परबवाडी, धर्मवीर नगर, लुईसवाडी भागातील ११०० गणेशभक्तांना हे पूजेचं साहित्य देण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading