श्रीकांत शिंदेंना २ लाख ५४ हजाराहून अधिक मतांची आघाडी

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना २ लाख ४९ हजार ६७४
मतांची आघाडी मिळाली आहे. ४ वाजून ४५ मिनिटांनी हाती आलेल्या आकडेवारीनुसार राजन विचारे यांना ४ लाख ३० हजार ४०६ तर आनंद परांजपे यांना १ लाख ८० हजार ७३२ मतं मिळाली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना २ लाख ५४ हजार
६४ मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना ३ लाख ५१ हजार २१९ तर
बाबाजी पाटील यांना ९७ हजार १५५ मतं मिळाली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ८७ हजार
५२७ मतांची आघाडी मिळाली आहे. कपिल पाटील यांना ३ लाख ५४ हजार ३५२ तर
काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना २ लाख ६६ हजार ८२५ मतं मिळाली आहेत.

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित ८८ हजार ४७३ मतांनी आघाडीवर
आहेत. राजेंद्र गावित यांना ५ लाख ७९ हजार ९ मतं तर बहुजन विकास
आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४ लाख ९० हजार ५३६ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading