राजन विचारेंना २ लाख ४३ हजारांची आघाडी

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना २ लाख ४३ हजार ४५१
मतांची आघाडी मिळाली आहे. ४ वाजून २० मिनिटांनी हाती आलेल्या आकडेवारीनुसार राजन विचारे यांना ३ लाख ९७ हजार ४६७ तर आनंद परांजपे यांना १ लाख ५४ हजार १६ मतं मिळाली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना २ लाख ३५ हजार
१४१ मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना ३ लाख २८ हजार २९७ तर
बाबाजी पाटील यांना ९३ हजार १५६ मतं मिळाली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ६४ हजार
६१३ मतांची आघाडी मिळाली आहे. कपिल पाटील यांना ३ लाख १२ हजार १९ तर
काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना २ लाख ४७ हजार ६ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading