श्रीकांत शिंदेंना २ लाखांच्या वर आघाडी

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना १ लाख ९१ हजार ९६३
मतांची आघाडी मिळाली आहे. ३ वाजून ३५ मिनिटांनी हाती आलेल्या
आकडेवारीनुसार राजन विचारे यांना ३ लाख १० हजार ९३० तर आनंद परांजपे यांना
१ लाख १८ हजार ९६७ मतं मिळाली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना २ लाख १ हजार
३६४ मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना २ लाख ८० हजार ३६४ तर
बाबाजी पाटील यांना ७९ हजार मतं मिळाली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ६१ हजार
१५७ मतांची आघाडी मिळाली आहे. कपिल पाटील यांना २ लाख ६४ हजार ५८३ तर
काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना २ लाख ३ हजार ४२६ मतं मिळाली आहेत.

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित ८९ हजार २०० मतांनी आघाडीवर
आहेत. राजेंद्र गावित यांना ५ लाख ७८ हजार २६१ मतं तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४ लाख ८९ हजार ६१ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading