कपिल पाटलांच्या आघाडीत घट

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना १ लाख ८३ हजार ९८७
मतांची आघाडी मिळाली आहे. ३ वाजून १० मिनिटांनी हाती आलेल्या
आकडेवारीनुसार राजन विचारे यांना २ लाख ८९ हजार ७२५ तर आनंद परांजपे यांना
१ लाख ५ हजार ७३८ मतं मिळाली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना १ लाख ९४ हजार
२८२ मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना २ लाख ६८ हजार ८२३ तर
बाबाजी पाटील यांना ७४ हजार ५४१ मतं मिळाली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ५६ हजार
६५६ मतांची आघाडी मिळाली आहे. कपिल पाटील यांना २ लाख ३७ हजार ५४१ तर
काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना १ लाख ८० हजार ८८५ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading