श्रीकांत शिंदेंची सव्वा दोन लाखांची आघाडी

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना २ लाख २२ हजार ७९७
मतांची आघाडी मिळाली आहे. ४ वाजून ५ मिनिटांनी हाती आलेल्या
आकडेवारीनुसार राजन विचारे यांना ३ लाख ६३ हजार ९०८ तर आनंद परांजपे यांना १
लाख ४१ हजार २११ मतं मिळाली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना २ लाख २४ हजार
९६२ मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना ३ लाख ११ हजार १३७ तर
बाबाजी पाटील यांना ८६ हजार १७५ मतं मिळाली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ५४ हजार
२७२ मतांची आघाडी मिळाली आहे. कपिल पाटील यांना २ लाख ८७ हजार ४७८ तर काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना २ लाख ३३ हजार २०६ मतं मिळाली आहेत.

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित ८९ हजार १४२ मतांनी आघाडीवर
आहेत. राजेंद्र गावित यांना ५ लाख ७८ हजार ४४१ मतं तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४ लाख ८९ हजार २९९ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading