जिल्हा क्रीडा आणि जिल्हा युवा पुरस्कार जाहीर

जिल्हा क्रीडा आणि जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ३ गुणवंत पुरूष खेळाडू, ३ गुणवंत महिला खेळाडू तर १ गुणवंत क्रीडा मार्गदर्शकाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारीला पालकमंत्री एकनाथजी शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. या पुरस्कारचे स्वरूप रोख रूपये १० हजार, सन्मानचिन्ह आणि गौरव पत्र असे आहे. तसेच २०१८-१९ व २०१९-२० करीता जिल्हा युवा पुरस्कारासाठी जिल्ह्यातून २२ प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यामधून २ युवक, १ युवती आणि २ संस्था असे एकूण ५ पुरस्कारास पात्र ठरले आहेत. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये १० हजार, सन्मान चिन्ह आणि गौरव पत्र तर संस्थेसाठी रोख रु. ५० हजार सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र असे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
यासाठी अमोल कडूसकर (पॉवरलिफ्टिंग) थेट पुरस्कार, सेहूल पांचाल (जिम्नॅस्टिक्स) थेट पुरस्कार
आणि यश सोनक (जलतरण) गुणानुक्रमे प्रथम पुरस्कार देण्यात येणार आहे. गुणवंत महिला खेळाडू म्हणून जयवंती देशमुख (पॉवर लिफ्टिंग ) थेट पुरस्कार, सिद्धी ब्रीद (जिम्नॅस्टिक्स) थेट पुरस्कार तर सुब्बुलक्ष्मी तेवर यांना (वुशू) गुणानुक्रमे प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून गेल्या १० वर्षात जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय पदक प्राप्त जिम्नॅस्टिक्स खेळाडू घडवून पवन भोईर यांनी ६७६ गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. जिल्ह्यात प्रौढ शिक्षण, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कला, क्रीडा, मनोरंजन, व्यसन मुक्ती, सांस्कृतिक, राष्ट्रीय एकात्मता कार्य इ. क्षेत्रात विविध कार्य विनामुल्य आणि सेवाभावी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या युवक, युवती व संस्था यांना जिल्हा युवा पुरस्कार शासन निर्णयानुसार दिला जातो.
जिल्हा युवा पुरस्कार २०१८-१९
युवक – अजित भालके – प्रथम क्रमांक
युवती – एकही प्रस्ताव पात्र नाही
संस्था – महाराष्ट्र युवा संघ , कल्याण – प्रथम

जिल्हा युवा पुरस्कार २०१९-२०
युवक – भरत बहिरा- प्रथम क्रमांक
युवती -पूजा आवारे- प्रथम क्रमांक
संस्था – मंथन युवा प्रतिष्ठान, वासिंद – प्रथम क्रमांक

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading