शीळ-डायघर भागातील भंगारच्या गोदामांना भीषण आग – सुदैवानं जिवितहानी नाही

ठाण्यातील शीळ-डायघर भागातील भंगारच्या गोदामांना भीषण आग लागली होती. मात्र सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. शीळ-डायघर भागातील गोसिया कंपाऊंडमध्ये ही आग लागली होती. या परिसरातील ३५ ते ४० गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी आग लागलेल्या ठिकाणी उभ्या करून ठेवण्यात आलेल्या काही दुचाक्या आणि चारचाकी गाड्या या आगीत भस्मसात झाल्या. अग्निशमन दलानं त्वरीत धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading