शिवसेनेने रद्द केलेला सावरकरांचा कार्यक्रम भाजप ठाण्यात घेणार

मराठी भाषा दिनी मनोरंजन होत नसल्याचं कारण दाखवून शिवसेनेनं रद्द केलेला अभिनेते शरद पोंक्षे यांचा अथांग सावरकर हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षातर्फे ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे. ठाण्यातील मराठी भाषा आणि सावरकर प्रेमींसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाण्यात भारतीय जनता पक्षातर्फे मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात आमदार निरंजन डावखरे यांनी अथांग सावरकर हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. सावरकरांवरील शिवसेनेचं प्रेम हे बेगडी असून महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमामुळे आणि काँग्रेसच्या संभाव्य आक्षेपाच्या भीतीमुळे शिवसेनेला सावरकरांपासून दूर रहावं लागत आहे. त्यामुळं करमणुकीचं कारण दाखवून अथांग सावरकर हा कार्यक्रम शिवसेनेकडून रद्द करण्यात आल्याची टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading