शिवसेनेच्या वृक्षाची सडलेली पाने गळून पडली असून आपल्यासारखे शिवसैनिकाच्या रूपाने नवी पालवी उभी राहणार आहे – राजन विचारे

शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने कोपरी, नौपाडा, चंदनवाडी, पाचपाखाडी, खोपट, महागिरी येथील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जुन्या आठवणींना उजाळा मिळून आनंद दिघे यांनी जो समाजसेवेचा वसा सुरू केला तो असाच सुरू ठेवावा. गेले ते कावळे उरले ते मावळे, शिवसेना ही नेहमी संघर्षातूनच उभी राहते त्यामुळे खचून जाऊ नका आता शिवसेनेच्या वृक्षाची सडलेली पाने गळून पडली असून आपल्यासारखे शिवसैनिकाच्या रूपाने नवी पालवी उभी राहणार आहे असं खासदार राजन विचारे यांनी सांगितलं. आपल्या प्रभागातील मतदार यादी अत्यंत बारकाईने चाळून घ्या नागरिकांशी थेट संवाद करायला सुरुवात करा तसेच ज्या शिवसैनिकांनी आपल्या जीवाचं रान करून भगवा नेहमीच उंचावत ठेवला त्यामुळेच महापालिकेत शिवसेनेचा भगवा हा कायम फडकत राहिला परंतु काही स्वार्थी राजकारणी यांनी शिवसेना पक्षाशी घात करून सत्ता मिळवली आहे. शिवसैनिकांना त्रास दिला गेला आहे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना या ठाण्याच्या शिवसेनेला गद्दारीचा डाग लावण्याचा प्रयत्न या राजकारण्यांनी केला आहे. मुख्यमंत्री पदाच्या लालसापोटी शिवसेना सोडून गेलेले महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे भाजपाच्या सोबतीने परराज्यात पाठविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आपल्या तरुण पिढीला उपलब्ध होणारा रोजगार काढून घेण्याचे घाणेरडे काम सध्या या महाराष्ट्रात सुरू आहे. सर्व जनता ही डोळ्यांनी बघत आहे यांना जनता आपला धडा नक्कीच शिकवणार त्याबद्दल तीळ मात्र ही शंका नाही. परंतु आपण आपली कामे सुरळीत सुरू ठेवा व येत्या दसरा मेळाव्यासाठी आपल्या विभागातून जास्त नागरिकांची उपस्थिती लावण्याचा सूचना या मेळाव्यात करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading