शिवसेनेचा माजी नगरसेवक महेश वाघ ला खंडणीविरोधी पथकाकडून अटक

शिवसेनेचा माजी नगरसेवक महेश वाघ याला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.कोर्टाच्या एका प्रकरणात मध्यस्थी करून व्यवसायिकाच्या बाजूने न्यायालयाचा निकाल लावून देतो असे
सांगून लाखो रुपये लाटून वर आणखी चार लाख रुपये मागितले ते देण्यास व्यायसायिकाने नकार दिल्या मुळे स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून त्याच्या वर गोळीबार करणा-या शिवसेनेच्या माजी नगरसेवक महेश वाघ याला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.पांचपाखाडी येथील फॅब्रिकेशन व्यावसायिक मनीष गुळवे वय 46 याचे त्याची सावत्र आई आणि भाऊ यांच्या बरोबर मालमत्ते प्रकरणी कोर्टा मध्ये वाद चालू आहे. या प्रकरणात मध्यस्थी करून मूळवे यांच्या बाजूने न्यायालयाचा निर्णय लावून देण्यासाठी खंडणी मागितली होती, मूळवे यांनी नकार दिल्या नंतर, गुरुवारी रात्री 2:30 वाजता नितिन कंपनी जंक्शन येथील सर्व्हिस रोड परिसरात वाघ याने मुळवे यांच्या वर गोळीबार केला, नेम चुकल्याने मूोडक्यात बचावले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading