धावत्या लोकलवर दारूची बाटली फेकून मारल्यामुळे एक महिला जखमी

मध्य लोकलवर ठाणे आणि कळवा स्थानकादरम्यान असलेल्या खाडी पुलाजवळ धावत्या लोकलवर दारूची बाटली फेकून मारल्यामुळे एक महिला जखमी झाली. लोकलमध्ये दारूची बाटली
फेकून मारल्यामुळे महिल्याच्या डोक्याला आणि हाताला मार लागला आहे. दारुच्या बाटलीची काच महिलेच्या हाताला लागल्यामुळे हाताला आठ टाके पडले आहेत. आशा पाटील यांनी रात्री
नऊ वाजण्याच्या सुमारास ठाणे स्थानकातून डोंबिवली जाणारी लोकल पकडली. लोकलमध्ये गर्दी असल्याने आशा पाटील दरवाज्याच्या आतील बाजूस उभ्या होत्या. लोकल ठाणे आणि कळवा
खाडी पुलाजवळ पोहचताच अचानक रिकामी दारूची बाटली हातावर आदळली. या दुर्घटनेत हाताला आणि डोक्याला दुखापत झाल्याचे आशा पाटील यांनी सांगितले. जखमी महिलेला कळवा
रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.दीड तास त्यांना कळवा शासकीय रुग्णालयात उपचार न देता जेजे रुग्णालयात जाण्यासाठी सांगितले .

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading