शिवसेनेकडून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल ५६७ बसेस सोडण्यात येणार

शिवसेनेकडून यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर करण्यात आला आहे. कल्याण लोकसभेतून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने यंदाही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल ५६७ बसेस सोडण्यात येणार आहेत. शनिवार आणि रविवारी खासदार श्रीकांत शिंदे हे या बसेसना भगवा झेंडा दाखवतील. याद्वारे सुमारे २५ हजारांहून अधिक नागरिक मोफत बस सेवेचा लाभ घेत गणपतीसाठी आपल्या गावी जाणार आहे. करोनानंतर सर्वच सण आणि उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून सण आणि उत्सवांवरील निर्बंध उठवण्यात येऊन राज्यात सणांसाठी पोषक वातावरण तयार करण्यात आले. दरवर्षी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने गणेशभक्त जात असतात. या गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्र सरकारच्या साहाय्याने विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यासोबतच कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे डबे वाढवणे, ज्यादा एसटी बसेस सोडणे अशा व्यवस्था केल्या आहेत. कल्याण लोकसभेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तब्बल ५६७ बसेसची व्यवस्था कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी करण्यात आली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading