शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबरनाथच्या शिवमंदिर परिसर सुशोभीकरणासाठी राज्य शासनाचा 138 कोटींचा निधी

देशभरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबरनाथच्या शिलाहारकालीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरणासाठी राज्य शासनानं 138 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 963 वर्षांपूर्वीच्या या प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभिकरण करून एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नातील एक महत्वाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. अंबरनाथ शहरात 963 वर्षापूर्वीचे शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर आहे. केवळ अंबरनाथच नव्हे तर राज्याचे भूषणअसणारे हे शिवमंदिर शिलाहारकालीन स्थापत्य कलेचा अप्रतिम अविष्कार आहे. श्रीकांत शिंदे यांनी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय किर्तीचा भव्य शिवमंदिर आर्ट फेस्टीव्हल मंदिर परिसरात आयोजीत करण्यास सुरूवात केली. 963 वर्षापूर्वीचे प्राचीन शिवमंदिर ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करून परिसरामध्ये या प्राचीन शिल्पाच्या धर्तीवर कामे केली जाणार आहेत. सुशोभिकरणाचे संपूर्ण काम काळया पाषाणात केले जाणार आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणारा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल यंदा १६ ते १९ मार्चदरम्यान रंगणार आहे. यंदाही अनेक प्रसिध्द कलाकारांची उपस्थित या कार्यक्रमाला असेल. दोन वर्षांनंतर होणाऱ्या याफेस्टिवलमधून अनोख्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी अनुभवता येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading